Posts

From Awareness to Action: Muktayan Foundation’s Journey in Promoting and Conserving India’s Constitution

Image
  भारतीय संविधान हा आपल्या लोकशाही, न्याय आणि सामाजिक समतेचा कणा आहे. आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या संविधान, त्याचे महत्त्व, त्यांच्या आयुष्यातील भूमिका आणि त्यांच्या दैनंदिन समस्यांवर संविधानाचा होणारा प्रभाव याबाबत अजूनही अनभिज्ञ आहे. आपण जाणतोच की, भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क, कर्तव्ये, लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य आणि समानता प्रदान करते. म्हणून आपल्या अधिकारांचे आणि कर्तव्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, जेणेकरून आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारेल आणि आपल्या देशाचा विकास होईल. मुक्तायन फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे, जी संविधानातील मूल्ये आणि तत्त्वांच्या आधारे कार्य करते. भारतातील प्रत्येक समाजघटकात संविधानाच्या मूल्यांचा अर्थ समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे या संस्थेने संविधान मूल्यांचा प्रसार करण्यासाठी कार्यशाळा, विविध उपक्रम, गटचर्चा, खेळ अशा जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संस्थेचे सदस्य आणि स्वयंसेवक यांनी हे उपक्रम राबवून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान दिले आहे. याचाच एक भाग म्हणून, २६ नोव्हेंबर संविधान दिनान...

Sanvidhan divas 2024

Image
"मुक्तायन फाउंडेशन" ही संस्था स्त्रिया, लहान मुले आणि वंचित घटकांच्या प्रगतीसाठी कार्य करणारी एक संस्था असून ही संस्था साताऱ्यात स्थित आहे. यासोबतच ही संस्था भारतीय संविधानाची मूल्ये जनमानसात रुजवून एक तर्कशुद्ध, मानवतावादी समाजनिर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात  जसे की विविध महापुरुषांच्या जयंती, सामाजिक सलोख्यासाठी सर्वधर्मीय सण-उत्सव आणि त्यात सर्व समाजघटकांचा समावेश होण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, महिलांसाठीचे मंच आणि लहान मुलांसाठीचे अभ्यास वर्ग. याचाच एक भाग म्हणून यंदा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. भारतीय संविधान हे जरी २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले असले तरी त्याचा स्वीकार हा दोन महिने आधीच, म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी झाला होता. याची आठवण म्हणून दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांपर्यंत संविधान व त्याचे असणारे महत्त्व पोहोचवणे हा होता. आजच्या काळात संविधानाच्या मूल्यांची होणारी पायमल्ली आणि मानवी हक्कांवर येणाऱ्...

Muktayan foundation

Image
  Muktayan Foundation is a multipurpose based organization, situated at satara. it is formed in march 2021  and its main purpose is humanity and harmony amongst the each layer of society. The slum area of satara city is the main field where the organization works.  Muktayan foundation did lot of activities like education for the dropout students during corona period, when most of the slum students cant get education and dropout chances of them were risen. so organization played important role for involvement of students in main stream under the project "Talim". Muktayan foundation believes in gender equality, so the programs for women's are designed in such a way that, the females can come and learn the terms of Indian constitution through games and activities, so that they can learn their rights. foundation also did activities for women education and health awareness.